“…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न” !! धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ सप्टेंबर २४ रविवार
मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला असून मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला असून हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या तसेच या भागात जमाव एकवटला यावरून ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.हिंदू मुस्लीम दंगे घडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.सिनेट निवडणुकीबाबत माहिती देण्याकरता आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आदित्य ठाकरे म्हणाले,धारावीचा प्रश्न गंभीर असून गेल्या एक-दीड वर्षांपासून अदाणी समूह धारावीत आले आहे आणि मुंबई लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हापासून धारावीची आणि महाराष्ट्राची एकजूट झालेली आहे व त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
संपूर्ण धारावीचे पुनर्वसन होणार आहे तरीही या कारवाया करण्याचा प्रयत्न सुरू आहे.अदाणी समूहाच्या घशात मुंबई जावी आणि राज्य यांच्या हातात राहावे आणि अदाणीला राज्य विकू शकतात.हिंदू मुस्लीम दंगली झाल्या तरच असे होऊ शकते त्यामुळे भाजपाचा हा शेवटचा प्रयत्न आहे.आमच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये अशी एकही घटना घडली नव्हती.खांद्याला खांदा लावून उभे राहतात.हिंदू मुस्लीम वाद,जातीचे वाद ते नाही जमले तर भारत पाकिस्तान वाद केले जातात.आपल्याकडून या वादात अडकवून ठेवतात आणि यांची मुले परदेशी राहायला,कामाला आहेत अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.