यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार
येथील नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांनी नुकतीच रावेर विधानसभा मतदार संघातील सहस्त्रलिंग या गावाला भेट देवुन त्यांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या.
राज्यात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला असुन भाजपाचे तरुण सक्रीय कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे हे मागील दोन वर्षापासुन रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरीकांशी सतत संपर्कात असल्याने येणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा उमेदवारास मिळेल असा अंदाज बांधला जात आहे.दरम्यान भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी नुकतीच रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील सहस्त्रलिंग या आदिवासी गावाला भेट देवुन आदिवासी ग्रामस्थांशी भेट घेत त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या व भविष्यात सदरील समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी ग्रामस्थांना दिले.प्रसंगी रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सिकंदर तडवी,भाजपा बुथ प्रमुख वहाब तडवी,सहस्त्रलिंग उपसरपंच करीम तडवी,ग्रामपंचायत सदस्य युनुस तडवी,चंद्रमणी तायडे, राजु तडवी,अमजद तडवी,रूबाब तडवी,अरमान तडवी,लुकमान तडवी,कलिंदर तडवी,छबील तडवी,शकील तडवी,राजु तडवी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सहस्त्रलिंग या आदिवासी पेसा योजनाअंतर्गत येणाऱ्या गावातीत पाझर तलावाचा प्रश्न २००६पासुन प्रलंबीत असल्याचे सांगुन गावातील पाणी पुरवठा,पाणी टंचाई,रस्ते,पथदिव्य हे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याचे ग्रामस्थांनी डॉ कुंदन फेगडे यांच्याशी संवाद साधतांना मांडल्या तर भविष्यात सदरील समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे अभिवचन डॉ कुंदन फेगडे यांनी ग्रामस्थांना दिले.