यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार
भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भाजयुमोचे जळगांव जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोच्या यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी यांची नुकतीच पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत यावल तालुकास्तरीय नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नेमणूक करून कार्यकारणी जाहीर केली.या कार्यकारणीत तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर,मयुर पाटील,यावल शहर सरचिटणीस व्यंकटेश बारी,उपाध्यक्ष रितेष बारी,सचिन चौधरी,दिनेश पाटील,योगेश पाटील,गौरव महाजन,वैभव वकारे,राहूल पाटील,कन्हैया वारके,सुनिल पाटील यांच्यासह सुमारे ३३ पदधिकारी यांची निवड करण्यात आली.सदरहू युवा मोर्चा यावल तालुका नवनियुक्त पदाधिकारी यांचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे,भाजयुवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,जेष्ठ पदाधिकारी हीरालाल चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,विलास चौधरी,हर्षल पाटील,भाजपा तालुका उमेश फेगडे यांनी स्वागत केले आहे.