Just another WordPress site

उरण कंठवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार

डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उरण कंठवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांना रविवार दि.२२ रोजी अमरदीप बाल विकास फाऊंडेशन महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था पनवेलकडून राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.नामदेव ठाकूर हे उरण सामाजिक संस्थेचे ते सदस्य आहेत.

कंठवळी या लहानशा गावात जन्मलेल्या नामदेव ठाकूर यांनी समाजसेवेचा वसा आपले आईवडील व जेष्ठ बंधू बी.एन.ठाकूर यांच्याकडून अंगीकारला आहे.डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांच्या समाजकार्याची दखल या अगोदर विविध सामाजिक संस्था बरोबर उरण तालुका तहसीलदार,पनवेल तालुका तहसीलदार,खालापूर तालुका तहसीलदार,पनवेल प्रांत आदिवासी विकास प्रकल्प पेण अशा शासकीय कार्यालयाने देखील दखल घेऊन त्यांना सन्मानित केले होते.रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी त्यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले.

नामदेव ठाकूर यांनी आदिवासी बांधवांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून पुढाकार घेतला,त्याना जातीचे दाखले,रेशन कार्ड,आधार कार्ड,मतदान कार्ड,घरकुल बचत गटाचे महत्व त्याच्यामध्ये उल्लेखनीय काम केले.आज अनेक रेशन कार्ड धारकांना त्याचा फायदा मिळाला आहे.उरण,पनवेल,खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बँक पासबुक,आधार कार्ड,पॅन कार्ड, घरकुलांचा लाभ देणे असेल वैयक्तिक लाभ देणे असेल किंवा बचत गटाला लाभ देण्यासाठी विखुरलेल्या असुशिक्षित आदिवासी बांधवांना एका छताखाली आणन्याचे काम केले आहे.त्याना मिळालेल्या सन्मानाबदल आदिवासी बांधवांबरोबर विविध पक्षांच्या पदाधिकारी व संस्थेच्या सभासदांनी नामदेव ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.