केऱ्हाळा येथील ग्रामविकास अधिका-यांच्या दुर्लक्षप्रकरणी त्यांची करण्यात यावी !! अन्यथा २ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्याचा मनसेचा इशारा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार
केऱ्हाळा ता.रावेर येथील ग्रामविकास अधिकारी एस.टी.पाटील यांनी जनतेची कामे न केल्यामुळे विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे अशा अधिकाऱ्यांना के-हाळा गावातून मुक्त करून दुसरा कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.सदरहू तक्रारीची दखल न घेतल्यास येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील निवेदनात नमूद केले आहे की,के-हाळा ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी एस.टी.पाटील यांच्या विरोधात नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत पण त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही.ग्रामविकास अधिकारी पाटील हे के-हाळा मुख्यालयी न राहता रावेर शहरात खाजगी कामात व्यस्त असतात यामुळे जनतेची कामे प्रलंबित राहतात त्यांच्या या वर्तणुकीमुळे गावाकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची गरज नसल्याचे सांगून त्यांची तात्काळ बदली करून गावाला त्यांच्यापासून मुक्त करण्याची मागणी केली आहे अन्यथा २ ऑक्टोबर गांधी जयंतीला जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला आहे.निवेदनाद्वारे मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढलकर ,किशोर नन्नवरे,राहूल महाजन,गोपाल महाजन,गोलू महाजन,गणेश महाजन,अमोल चौधरी,महेन्द्र महाजन,शुभम महाजन यांच्यासह केऱ्हाळा ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.