Just another WordPress site

चिरनेर आक्कादेवी वाडीवर नाग्या कातकरी यांचा हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात

जुलमी इंग्रज सत्तेला सळो की पळो करण्यासाठी नाग्या कातकरी यांची भूमिका महत्वाची - आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२६ सप्टेंबर २४ गुरुवार

वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने २५ सप्टेंबर १९३० झाली झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा दिन चिरनेर आक्कादेवी कातकरीवाडी धरणाजवळ सत्याग्रहाच्या मुख्य ठिकाणी मोठ्या उत्साहात मान्यवरांचे व कोकण प्रांतातील वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.यावेळी या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आ.प्रशांत ठाकूर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,तालूका अध्यक्ष रवि भोईर,वनवासी कल्याण आश्रमाचे तालूका अध्यक्ष मनोज ठाकूर,श्रीमती मिरा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्यासह चिरनेर ग्रामपंचायत सरपंच पदाचे लढवू उमेदवार युवा नेते प्रतिक गोंधळी,माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर,सुशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चिरनेर जंगलसत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्या साठी आदिवासी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी या विराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील एकूण आठ शूर विरांनी आपले प्राण पणाला लावून जुलमी इंग्रज सत्तेविरोधात २५ सप्टेंबरचा लढा केला दिला आहे व त्यामध्ये आदिवासी समाजाचे नाग्या कातकरी यांनी महत्वाची भूमिका बजावत इंग्रज सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडले होते त्यांचा सार्थ अभिमान सर्वांना असल्याचे गौरोदगार आ.प्रशांत ठाकूर यांनी काढले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते यावर्षी १०वी,१२वी,१५वी पास झालेल्या गुणवंत जनजाती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.जनजाती समजासाठी रात्री अपरात्री कधीही धाऊन जाणारे सर्प मित्र रायगड जिल्हा भूषण जयवंत रामदास ठाकूर-(संस्थापक अध्यक्ष फ्रेंड्स ऑफ नेचर Fon सर्प निसर्ग संवर्धन संस्था) यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय हुतात्मा नाग्या कातकरी जनजाती पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या अनेक वर्षे कार्य करत असलेल्या जनजाती बांधवांचे सत्कार करण्यात आले.तसेच २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्त साधूनइंडीयन फार्मास्युटिकल असोसिएशन,बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी,उरण तालुका केमिस्ट अँड डीस्ट्री ब्यूटर्स असो.सलग्न CDARD यांच्या वतीने २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिना निमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर,औषधे सेवन मार्गदर्शन करण्यात आले.तसेच उपस्थितांना कृमिनाशक गोळ्या वाटप केले आणि औषध सेवन विषयी माहिती दिली गेली.वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे,जिल्हा सचिव रवींद्र पाटील,इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश शहा,फार्मासिस्ट विजय घाडगे, फार्मासिस्ट सुरेश भाई शहा,सुरेश कुमार चौधरी,मनोज ठाकूर,उमाकांत पानसरे,बाळू घालवत ,राजेश्वर घालवत,विश्वनाथ पाटील,संदेश अतपाडकर,मदन गिरी,अभिनय पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते.जिल्ह्यातील अनेक वाड्यावरील जनजाती बांधवांचे पारंपरिक नाच या ठिकाणी करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयघोष करीत शेकडोच्या संख्येने कोकण प्रांतातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.हुतात्माच्या स्मुती जाग्या रहाव्या,नव्या पिढीला त्याचे महत्व आत्मसात व्हावे यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबरला शासनाच्या वतीने उरण पोलिसांच्या मार्फत बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते.तर संपूर्ण कोकण प्रांतातून आलेल्या आदिवासी महिलांनी पारंपारिक नाचांचे सादरीकरण करुन मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी उरण,पनवेल,पेण,अलिबाग तालुक्यासह रायगड,ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व महिलांनी मोठ्ठी उपस्थित दाखवून आदिवासी समाजाची एकजुट दाखविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.