Just another WordPress site

दहीगाव येथे राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट मेळावा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार

तालुक्यातील दहिगाव येथील वीज उपकेंद्राच्या समोरील असलेल्या तोल काट्याच्या आवारात काल दि.२७ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत एकता महिला प्रभात संघ यांनी बचत गट महिला गटनिहाय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सरपंच अजय अडकमोल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच देविदास पाटील सेंट्रल बँक ऑफ इंडिया यावल,स्टेट बँक शाखा सावखेडा सिम,महाराष्ट्र राज्य ग्रामीण बँक व्यवस्थापक तसेच मुख्याध्यापक पी.बी.पाटील, मुख्याध्यापिका सरिता जाधव,पल्लवी महाजन,पुंडलिक पाटील,हेमलता महाजन,एम.आर.महाजन,सत्तार तडवी यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

याप्रसंगी एकता महिला प्रभाग संघाकरिता कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर मेळाव्यात रक्त गट तपासणी व आरोग्य तपासणी तसेच महिलांच्या अत्यावश्यक गरजू समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आजच्या महिला सक्षम आहेत व शासनाचा माणसापेक्षा महिलांवर विश्वास आहे म्हणूनच महिला बचत गट निर्माण करण्यात आलेले आहे व महिला प्रामाणिक असल्याने त्या कर्जफेड नियमितपणे करतात म्हणूनच बचत गटांची उन्नती होते आणि त्याच माध्यमातून दहिगावचा एकता महिला प्रभाग संघ तालुक्यात अग्रेसर ठरलेला आहे त्यांचा आदर्श तालुक्यातील महिला बचत गटांनी घ्यावा असे आवाहन सरपंच अजय अडकमोल यांनी केले.तर महिला बचत गटाच्या प्रवक्त्या संगीता पाटील पिळोदा यांनी आपल्या मनोगतात वावर आहे तर पावर आहे प्रत्येकाने वावराकडे वळावे आणि मेहनत करावी व सेंद्रिय खतामुळे शेतकरी जास्तीचे पीक उत्पन्न काढू शकतो म्हणूनच प्रत्येकाने आपली मुलगी शेतकऱ्याला दिली पाहिजे असे माझे मत आहे या भाषेत महिला वर्गाला उद्देशून पाटील यांनी आवाहन केले.

याप्रसंगी दहिगाव साखळी गटातील महिला बचत गटांना २९ लाख ४० हजार रुपयाचे धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व वितरित करण्यात आलेल्या कर्जाचा लघु उद्योगासाठी फायदा घ्यावा असे आवाहन महेंद्र सोनवणे यांनी केले.दरम्यान महिला बचत गटांना ५० टक्के सूट दिली जात होती व त्यात अमुलाग्र बदल होऊन आज रोजी महिला बचत गटांना भरघोस मदत केली जात आहे या संधीचा लाभ बचत गटांनी घ्यावा आणि लहान मोठे उद्योग उभारावेत असेही सोनवणे यांनी यावेळी म्हटले.तसेच उपसरपंच देविदास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व बचत गटाला आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करू असे आश्वासन दिले.सदर कार्यक्रमात व्यवस्थापन कक्ष अंतर्गत असलेले अधिकारी आशिष गवई,महेंद्र सोनवणे,अमोल झाडे,शरद सर,सोपान सर,सय्यद सर यांच्यासह एकता महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी शितल पाटील,सोनाली कोळी,वैशाली पाटील,अनिता पाटील,उषाबाई पाटील,सविता पाटील,सरिता पाटील, दिपाली पाटील,सोपान पाटील,मीराबाई महाजन,ग्रामसेवक चौधरी,आशिष गवई,शैलेंद्र पाटील,हरी पाटील,शरद शिंदे,सोपान बादशाह,सय्यद सर,साधना दांडेकर,सुनीता नेहते सह अनेकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.