विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (वृत्तसेवा) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती युनिव्हर्सिटी पनवेलचे विद्यार्थी शेखर वसंत पाटील यांनी नुकतीच एल एल एम ,मास्टर ऑफ लॉ मध्ये ७९.९४ मार्क मिळवून उत्तीर्ण झाले.छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल येथे पदवीदान समारंभात पद्मश्री डॉक्टर जी डी यादव,युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष केशव बढाया,रजिस्टर डॉक्टर शर्मा यांच्या हस्ते पदवी देण्यात आली.
शेखर पाटील यांनी कॉन्स्टिट्यूशन या स्पेशल सब्जेक्ट मधून पदवी ग्रहण केली.पत्रकारिता करत समाजकारण करत नोकरी सांभाळून त्यांनी एल एल एम पदवी प्राप्त केली.त्यांना लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर एस पी मिश्रा,डॉक्टर अवनी मॅडम,डॉक्टर पंकज सर यांनी मार्गदर्शन केले.शेखर पाटील हे उरण तालुक्यातील पिरकोन गावाचे रहिवासी असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पदव्या घेतल्या आहेत.ते उच्च विद्याविभूषित आहेत.सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.त्यांनी एल एल एम पदवी ग्रहण केल्याबद्दल त्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.व्हाट्सअप,फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.