विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
उरण ते जुईनगर प्रवास सुखाचा व्हावा,प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात,प्रवाशांच्या वेळेची व श्रमाची बचत व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस दिवंगत प्रशांत पाटील यांनी उरण चारफाटा येथे उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक मालक संघटनेची स्थापना केली.या संघटनेच्या माध्यमातून समस्त उरणकरांना उरण ते जुईनगर जाण्यासाठी टॅक्सीचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला.चांगली सेवा असल्यामुळे जनता टॅक्सीने मोठया प्रमाणात प्रवास करू लागली.स्वर्गीय प्रशांत पाटील यांनी घालून दिलेले नियम व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर सदर संघटनेचे पदाधिकारी सदस्य मार्गक्रमण करीत असून या संघटनेची सभा उरण मध्ये शासकीय विश्राम गृह डाऊर नगर येथे संपन्न झाली.यावेळी मात्र प्रशांत भाऊ पाटील यांची उणीव सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना भासली.त्यांचे समरण करुण या बैठकीला सुरवात झाली.
उरण जुईनगर पनवेल टॅक्सी चालक मालक संघटनेची सर्वसाधारण सभा काल रविवार दि.२८सप्टेंबर २४ रोजी उरणमध्ये पार पडली.या मीटिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट )महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस व जेष्ठ सल्लागार भावनाताई घाणेकर तसेच उरण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार उपस्थित होते.यावेळी संजय पवार यांनी वाहतूकीचे नियम व शिस्त याबद्दल सर्वांना चांगल्या प्रकारे मागदर्शन केले.भावनाताईंनी सांगीतले कि,आपल्या संघटनेसाठी लागेल ती सर्वतोपरी मदत करेन व सर्वांना सहकार्य करीन.या मिटिंगचे आयोजन संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश कांबळे यांनी केले.यावेळी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.यावेळी विविध समस्या व त्यावर उपाय योजना बद्दल चर्चा करण्यात आली.संघटनेतर्फे भावनाताई घाणेकर व संजय पवार यांचे आभार मानण्यात आले.एकंदरीत ही बैठक मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.