यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील यावल वनविभागास मिळालेल्या गुप्त माहीतीवरून वन विभाग पथक वैजापूरसह परिमंडळ बोरअजंटी मधील मौजे बोरअजंटी या गावाजवळ तपासणी घेतली असता साग कट साईज नग एकूण ७९ घनमीटर ०,६६४ माल किंमत२२ हजार ८६३ रूपये सागबल्ली नग ९ माल किंमत २७०० रू,खाट तयार माचे ४ माल किंमत ८०० रू,कटर मशीन १ किंमत १००० रू,रंधा मशीन १ किंमत १ooo रू,गिरमिट २ किंमत २०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २८ हजार ५६४ रुपये आहे तरी सदरचा जप्त मुद्देमाल हा शासकीय वाहनाने वाहतूक करुन वनपरिक्षेत्र चोपडा आगारात जमा करण्यात आला आहे.सदर कार्यवाहीबाबत वनरक्षक बोरअजंटी यांनी गुन्हा नोंदवलेला असून पुढील तपास व चौकशी वनपाल बोरअजंटी करत आहेत.
सदरील कार्यवाही निनु सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा),जमीर मुनीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,सदगिर सर विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे,प्रथमेश व्ही.हाडपे,सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान एम.सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाहीत वैजापूर वनक्षेत्रातील पथक व येथील सर्व अधिकारी,वनमजूर व वनकर्मचारी वनसेवक यांच्या उपस्थितीत होते.सदरहू उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वनविभाग जळगाव व सहाय्यक वनसंरक्षक चोपडा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्याकडून जनतेस आव्हान करण्यात येते की,कोणत्याही प्रकारचा वन्यजीव तस्करी अवैध,वृक्षतोड अवैध लाकूड वाहतूक तसेच वनवा व अतिक्रमणचा गुन्हा आढळून आल्यास आपण एक सुज्ञ नागरीक म्हणुन त्वरित वन विभागाशी संपर्क करावा किंवा महाराष्ट्र शासन वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या वरिष्ठांच्या वतीने करण्यात आले आहे.