यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथील आगारातुन अखेर रात्रीची चोपडा जाण्यासाठी शेवटची बस व भुसावळ जाणारी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दुर झाली असुन प्रवाशांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांचे व त्यांच्या सहकारी मित्रमंडळीचे विशेष कौत्तुक करून आभार मानले आहे.
एसटी महामंडळाचे जळगाव विभाग विभागीय नियंत्रक भगवान जगनोर हे यावल आगारच्या भेटीला आले असता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार व त्यांचे सहकारी यांनी भेट घेवुन यावल एसटी आगार संदर्भातील प्रवाशांच्या समस्या व आगारासाठी नवीन बसस्थानक ईमारतीचे अनेक वर्षापासुनचे प्रलंबित असलेले काम व वेळेअभावी काही बससेवा सुरू करावी तसेच यावल आगारास नविन बसेस मिळाव्यात अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.दरम्यान विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी नितिन सोनार सह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाच्या प्रवाशी संदर्भातील समस्या जाणुन घेत निवेदनाची दखल घेत यातील काही बससेवा त्वरीत सुरू केली व इतर समस्याबाबत समाधानकारक उत्तर दिले.दरम्यान रात्री ७ वाजेनंतर चोपडाकडे जाण्यासाठी बससेवा नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय व अनेक आर्थिक समस्या सह अडचणींना सामोरे जावे लागत असे याशिवाय भुसावळला जाणारे प्रवाशी नागरिक व शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चांगली एस टी बस सेवा उपलब्ध करावी अशा मागण्यात आल्या होत्या.सदरहू येथील आगारातुन अखेर रात्रीची चोपडा जाण्यासाठी शेवटची बस व भुसावळ जाणारी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दुर झाली असुन प्रवाशांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांचे व त्यांच्या सहकारी मित्रमंडळीचे विशेष कौत्तुक करून आभार मानले आहे.