Just another WordPress site

शासनाने विधवा महिलांना देण्यात येणारी सानुग्रह मदत त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी-सीमाताई घरत यांचे आवाहन

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार

पतीच्या निधनानंतर सरकार विधवा महिलांना सानुग्रह अनुदान मदत म्हणून देते मात्र त्यांचा मुलगा सज्ञान म्हणजे १८ वर्षांचा झाला की देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदानाची मदत बंद करते.विधवा महिलांना देण्यात येत असलेली सानुग्रह अनुदान मदत बंद न करता त्यांना ती मदत त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी असे आवाहन रायगड भूषण सीमाताई अनंत घरत यांनी नुकतेच केले आहे.

उरण चारफाटा येथे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर भोईर यांच्या एस्टिस्टड जवळ कार्यालयात शेकापतर्फे निराधार महीलांचा साडी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उरण महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई घरत,नयना पाटील,केगाव ग्रा.पं.चे सरपंच विना नाईक यांचा सरपंच म्हणून सत्कार करण्यात आला.उरण तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर,आगरी,कराडी,कातकरी समाजिक संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर भोईर,चाणजे ग्रा.पं.चे माजी सरपंच प्रदीप नाखवा,माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा,केगाव उपसरपंच चिंतामण जी,शंकर भोईर, सुरेखा महाले,नाहिदा ठाकूर,सुप्रिया म्हात्रे,वामन तांडेल,पत्रकार अँड.शेखर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्रीगणेशाचे पुजन विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले व समाजसेवक प.शि.म्हात्रे यांच्या प्रतिमेस विधवा महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राभाऊ म्हात्रे यांनी केले.यावेळी मोरेश्वर भोईर आणि टिम यांनी प्रत्येक विधवा महिलांना साडीची भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.