यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वात ४ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावात संस्थेच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत नोंदणी असलेल्या सर्व सभासदांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे सभासदांना १० % टक्के लाभांश वाटप आजपासून सुरू करण्यात आला.
आज दि.१ ऑक्टोबर मंगळवार रोजी लाभांश घेण्यासाठी आलेले प्रथम सभासद जयंत उखर्डू महाजन सातोद यांना यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तेजस पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला.यावेळी सोसायटीचे व्यवस्थापक संजय भोईटे,सुरेश यावलकर,रामचंद्र भोईटे उपस्थित होते.संस्थेच्या वाटचालीत सभासदांचे सहकार्य कायम संघाच्या पाठीशी राहिलेले आहे.सभासद हाच संस्थेचा प्रमुख पदाधिकारी असतो असे यावेळी उपसभापती तेजस पाटील यांनी सांगितले.