डांभुर्णी गावाच्या शिरेपेच्यात एक मानाचा तुरा !! कु.उज्वला पाटील बनली वर्धा सत्र न्यायालयाची स्टेनोग्राफर !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार
तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवाशी व स्वयंदीप परिवाराची विद्यार्थिनी कु.उज्ज्वला कैलास पाटील हिची वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफरपदी यशस्वी निवड झाली आहे.स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित मोफत अभ्यासिका आणि ग्रंथालय डांभूर्णीच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी कु.उज्ज्वला कैलास पाटील हिचे जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदी अंतिम निवड झाली आहे.यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करून गावातील जास्तीत जास्त मुले प्रशासकीय सेवेत दाखल झाली पाहिजे या हेतूने अभ्यासिका गावत सुरु केली होती आणि त्याचे फलित आता दिसायला लागले आहे.
सदर निवडीबद्दल स्वयंदीप परिवार आणि डांभुर्णी ग्रामस्थ यांच्याकडून उज्ज्वला आणि तिच्या आई आणि वडिलांचे देखील मनपूर्वक अभिनंदन कारण तिच्या पालकांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठींब्यामुळे हे शक्य झाले आहे.कु.उज्ज्वला हिच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) आणि परिवार डांभूर्णी स्वयंदीप परिवार डांभूर्णी व समस्थ डांभुर्णी ग्रामस्थांनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.