विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑक्टोबर २४ शनिवार
उलवे मधील विविध रस्त्यावर जे कोंबडे-बोकडे कापले जात आहेत.मांस विक्री केली जात होती ही दुकाने अनधिकृत आहेत अशी अनधिकृत चिकन मटणची दुकाने उलवे मध्ये सर्वत्र थाटलीं आहेत त्यामुळे मोठया प्रमाणात शाळे लागत रोगराई पसरत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तरी देखील सिडको प्रशासन किंवा पोलीस प्रशासनतर्फे जाणीव पूर्वक कारवाई केली जात नाही.हिंदू धर्माचा नवरात्र उत्सव चालू झाला आहे,डेंग्यूने,मलेरियाने उलवे शहरमधील लोक मृत्युमुखी पडत आहेत परंतु तक्रार करून व पाठपुरवठा करून सुद्धा कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनतर्फे झाली नव्हती.उलवे शहर स्वच्छ व सूंदर राहावे,नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे,कचरा- घाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी उलवे शहराला न्याय मिळवून देण्यासाठी दि.३ ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उलवे नोड शहराध्यक्ष संतोष काटे हे आमरण अन्नत्याग उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवार दि.४ ऑक्टोबर २४ रोजी संध्याकाळी ६ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील व बसरूल खान,मोवीन कुरेशी,सलीम कुरेशी,महंमद सलीम शाह,गुलाम खान,जुबेर खान,तौशीब कुरेशी हे व्यापारी व उलवे शहरमधील इतर मच्छी मटण चिकन विक्रेते,व्यापारी यांनी उपोषणकर्ते संतोष काटे यांची उपोषण स्थळी भेट घेतली.
यावेळी सदर समस्येबाबत संतोष काटे यांनी व्यापारी वर्गाला माहिती दिली व सदर समस्यामुळे नागरिकांच्या जीवाला कसा धोका आहे हे समजावून सांगितले.यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपोषण कर्ते संतोष काटे यांना जाहीर पाठिंबा देत व्यापारी वर्गांना कचरा घाण हटविण्याबाबत विनंती केली.संतोष काटे यांच्या उपोषणची दखल घेत शाळेच्या परिसरातील चिकन मटण मांसचे दुकाने हटवू,घाण कचरा करणार नाही असे आश्वासन व्यापारी वर्गांनी संतोष काटे यांना दिले.यावेळी व्यापारी वर्गानी आम्हाला सिडको मार्फत गाळे उपलब्ध करून दया.फ्लॅटर हाऊस उपलब्ध करून दया अशी मागणी केली.मागण्या मान्य झाल्याने राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन संतोष काटे यांनी उपोषण स्थगित केले.यावेळी उपाध्यक्ष भारत निकाळजे,उपाध्यक्ष राहुल पाटेकर,सरचिटणीस उदयभन मिश्रा,युवक उपाध्यक्ष महेश पाटील,पृथ्वी नाईक,संतोष डोंगरे,कुलदीप तिवारी,प्रेसिला ब्रिटो,सुनीता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.संतोष काटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच या उपोषणास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे संतोष काटे यांनी आभार मानले आहेत.