विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑक्टोबर २४ शनिवार
आज-काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या-गावं उध्वस्त केली जात आहेत आणि हे सर्व पाहता ” माझा गावं माझा अभिमान ” ही संकल्पना उराशी बाळगत आपल्या गावांच अस्तित्व टिकलं पाहिजे ! त्यांच्या नावांच अस्तिव टिकलं पाहिजे !! म्हणून आज पर्यंत उरण,पेण,पनवेल ह्या तालुक्यांसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुरचुंब गावं आणि अश्या अनेक गावांना त्यांच्या नावांचे नवीन नामफलक(बोधचिन्ह ) अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नामफलक बनवून देण्याचे औदार्य दाखविणारे युवा समाजसेवक आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून आज पुन्हा एकदा मुंबई – गोवा हायवेला हायलाईट करणाऱ्या एका सुंदर गावाच म्हणजेच पनवेल तालुक्यातील खारपाडा गावात “आपला खारपाडा” या नावाचे विद्युत रोषणाईने चमकणारे नवीन नामफलक ( बोधचिन्ह )खरोशी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते महेशदादा घरत आणि खारपाडा गावचे उपसरपंच संजयदादा घरत यांच्या विनंतीरुपी शब्दाला मान देऊन राजू मुंबईकर यांनी आपल्या औदार्यातून बनवून दिले आणि त्या नामफलकाचा अनावरण सोहळा कार्यक्रम गांधी जयंतीचे औचित्य साधत खारपाडा गावात शिवस्मारक वाचनालयाच्या प्रांगणात साकारण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कैलास घरत यांनी आपल्या ओघावत्या भाषा शैलीत केले.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून साकारलेल्या खारपाडा गावात “आपला खारपाडा ” ह्या नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक स्नेहलजी पालकर,आगरी,कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत,गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष नवनीत पाटील,प्रणव सावंत,खारपाडा गावाच्या सरपंच नेत्राताई घरत, उपसरपंच संजय घरत,पत्रकार कैलास घरत,जेष्ठ समाजसेवक मधुकर घरत,सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई घरत,राजश्रीताई घरत,(शिवसेना पेण ता.महिलाअध्यक्षा),छायाताई घरत( महिला संघटिका),गजानन घरत (शिवसेना शाखा प्रमुख),अभिजित घरत (उपाध्यक्ष -वाईल्ड लाईफ स्टडीज ),रामचंद्र ठाकूर(तंटमुक्ती अध्यक्ष),निशाकर घरत,तुकाराम घरत,नितिन घरत,महेंद्र घरत,भूपेश घरत,शंकर घरत,मनोहर ठाकूर, हरिभाऊ घरत,चेतन घरत,कैलास पाटील,प्रशांत घरत,आयुष घरत,रोहिणी मोकल,विद्या घरत,भास्कर घरत,देविदास घरत,दिलीप घरत,कैलास पाटील,नरेश घरत आणि खारपाडा गावातील महीलां भगिनीं आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.