Just another WordPress site

विनापरवाना शेतीमालाची खरेदी करणे व्यापाऱ्याला पडले महागात !! कृउबाचे सभापती राकेश फेगडे अॅक्शन मोडवर !! व्यापाऱ्याकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार

येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेतकऱ्यांच्या हितासाठी अॅक्शन मोड पर आले असुन परवाना नसतांना शेतीमाल खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यांमध्ये ‘भिती निर्माण झाली आहे.दरम्यान तालुक्यातील दहिगाव येथे विनापरवाना मका खरेदी करतांना सावदा येथील एक व्यापारी मिळून आल्याने तसेच त्या व्यापाऱ्याची संपुर्ण चौकशी केल्यावर संबधीत व्यापारी व मक्याने भरलेली ट्रक यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणून सदरील व्यापाऱ्याला सभापती राकेश फेगडे यांनी २१ हजार रुपये दंड वसुल केला आहे.यामुळे यावल तालुक्यात बोगस व्यापाऱ्यांना मोठी चपराक बसली असून विनापरवाना धान्य खरेदी केल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते या दृष्टिकोनातून सभापती राकेश फेगडे सह संचालक मंडळ आणि येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क** धोरण अवलंबले असून जो कोणी विनापरवाना शेतकऱ्यांचा म** खरेदी करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे या आधीच बाजार समितीने गावोगावी रिक्षा फिरवून लाऊड स्पीकर मधून जाहीर केलेले आहे नव्हे तर प्रत्येक विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून नोटीस चिटकवण्यात आली आहे.याच धर्तीवर दहिगाव येथील चार ते पाच शेतकऱ्यांचा मका सावदा येथील व्यापारी शेख रईस शेख सलीम कुरेशी यांनी चढ्या भावाने खरेदी केला असे स्पष्ट झाले. सदर संबंधित शेतकऱ्यांची सभापती राकेश फेगडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी संपर्क साधून आपल्या मक्याचे पैसे संबंधित व्यापाऱ्याने नगदी पैसे दिलेत का असे विचारणा केली असतात त्यांना पैसा मिळाल्याचे सांगण्यात आले.मात्र सदरील व्यापारी हा  कृषी उत्पन्न बाजार समितीची फी व विनापरवाना भुसार धान्य खरेदी करीत असल्याचे निष्पन्न झाले यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी दहिगाव वरून कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे आणून लावली व संबंधित व्यापाऱ्याला सावदा येथून बोलावून बाजार समितीचे सर्व नियम कसे आहेत हे सांगितले व त्यानुसार झालेली चूक लक्षात येताच व्यापारी रईस शेख सलीम कुरेशी यांच्याकडून २१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आले.सदरहू मक्याने भरलेली ट्रक वाहन क्रमांक एम एच ४६ ए एफ ५५५४ हा संबंधित व्यापाऱ्याच्या ताब्यात दिला.दरम्यान या वाहनावरील वाहनचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांचा जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.सदरच्या या दंडात्मक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे शेतकरी बांधवांकडून शेतीमालाची खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यामध्ये चांगलेच भितीचे वातावरण पसरले आहे.यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितासाठी सभापती व त्यांच्या संचालक मंडळाने घेतलेला या निर्णय व केलेली कारवाईचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.