विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे साहेब यांची ६९ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.जयंती निमित्त अनेक नेते मंडळी यांनी या कार्यक्रमात शाम म्हात्रे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी २८ सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले होते व त्या स्पर्धांचे बक्षीस समारंभ ६ ऑक्टोबर रोजी शाम म्हात्रे साहेब यांच्या जयंतीदिनी करण्यात आले.त्यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक नियती पाटील,हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरदा स्वप्नील उपाध्ये,काव्य लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनिता सुधीर राजदेव, पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अरुणा चिरपे,चित्रकला स्पर्धेमध्ये कशिष गणेश तिखे तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेखा भूषण घारे आणि एकपात्री-दविपात्री अभिनय स्पर्धेमध्ये मानसी प्रकाश मुंढे हे सर्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.या स्पर्धांचे बक्षीस वितरण कोकण श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय वढावकर,आगरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक जे डी तांडेल तसेच कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे ह्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमावेळी पनवेल मधील महिला पत्रकारीतेत सक्षम रित्या काम करणाऱ्या रुपालीताई शिंदे यांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी शिवभक्ती भजन मंडळ कर्जत यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुदाम पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी,हेमराज म्हात्रे अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी,पंकज भगत मुख्याध्यापक आगरी शिक्षण संस्था,नाना म्हात्रे माजी अध्यक्ष खालापूर काँग्रेस कमिटी,आर डी पाटील लिडर एच आय एल कंपनी,भरत जाधव अध्यक्ष पनवेल तालुका शिवसेना तसेच कोकण श्रमिक संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष व कामगार यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली होती.प्रसंगी शाम म्हात्रे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना सर्व मान्यवरांनी म्हात्रे साहेबांचे कार्य ज्या प्रमाणे श्रुती म्हात्रे चालवत आहेत तर येत्या दिवसांमध्ये श्रुती म्हात्रे यांना विधानसभेमध्ये पाहण्याची इच्छा देखील आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.याप्रसंगी श्रुती म्हात्रे यांनी शाम म्हात्रे साहेबांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा देत दी बा पाटील साहेब व शाम म्हात्रे साहेब यांच्या विचारांना धरून काम करताना प्रसंगी कुठे अडचणी येत असताना जयंती साजरी करीत असताना पुन्हा काम करण्याची स्पूर्ती मिळते असे देखील या ठिकाणी प्रामुख्याने सांगितले.या प्रसंगी कामगार वर्गानी देखील शाम म्हात्रे साहेबांप्रमानेच श्रुती म्हात्रे देखील काम करत आहेत अश्या भावना व्यक्त करत असताना श्रुती म्हात्रे यांनी हे यश एकट्याचे नाही तर कोकण श्रमिक संघटनेच्या सर्व सभासदांचे आहे असे देखील या ठिकाणी आवर्जून सांगितले तसेच कोकण श्रमिक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण कामगार वर्गाला शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले तसेच काल सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी आगरी शिक्षण संस्था शाळेत व गणेश मंदिर मार्केट येथे देखील सकाळी दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांची जयंती साजरी करण्यात आली.