पुढे उद्धव ठाकरे म्हणाले,जे काही समारंभ चालले आहेत ते बघा कसे चालले आहेत जसे काही यांनी केले.मी कधीही कुठला कार्यक्रम केला नाही कारण मी जे काही शेतकऱ्यांसाठी समाजातल्या घटकांसाठी केले ते कर्तव्य म्हणून केले.करोना काळात जे काम केले ते कामही पुसण्याचा प्रयत्न केला जातो आहे.भाजपाशासित राज्यात माझ्या महाराष्ट्राचे काम बघा जर माझा कारभार चांगला नसेल तर कुणाला तोंड दाखवणार नाही.करोना काळातला घोटाळा काढता.पीएम केअर फंडाच्या घोटाळ्याबाबत कुणी काही बोलतच नाही.यांनी एवढे घोटाळे केलेत की ७० हजार कोटींचा घोटाळा लाजतो,शी..मी काय घोटाळा आहे का ? मी तर सुट्ट्या पैशांचा घोटाळा,एवढे मोठे घोटाळे झाला आहे.सगळा आपल्या लुटीचा पैसा आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी सुरत लुटली होती मात्र केंद्रात बसलेले दोन ठग हे महाराष्ट्र लुटत आहेत.लुटीचा पैसा वापरुन जाहिरात करत आहेत.तारका,तारे घेऊन आमच्या डोळ्यांसमोर काजवे चमकवत आहेत.सरकारी जाहिराती छापून आणतात.फेक नरेटिव्ह जाहिरातींच्या माध्यमातून हे बिघाडलेले सरकार दाखवत आहे.२०१४ ला मोदींनी चाय पे चर्चा केली होती.आता तेव्हा चहा कितीला मिळायचा आणि आत्ता किती मिळतो ते जरा तपासा,जीएसटी किती लागला तेपण तपासा.मुलगी शिकली प्रगती,पुढे काय १५०० देऊन घरी बसवली.त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय ? कोव्हिड काळात जे सामंज्यस करार झाले होते ते सगळे उद्योग गद्दारांनी गुजरातला पाठवले.या दोन ठगांना विचारायचे आहे का आमच्या सुखात मीठ कालवत आहात ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.