Just another WordPress site

प्रवाशी बसने अचानक पेट घातल्याने प्रवाशांची धावपळ !! नागरीकांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार

येथील बसस्थानकाजवळ जळगाव विदगाव मार्गे जाणारी यावल आगारातील एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल १४०५ ही बस आज दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून जळगावकडून यावलकडे येत असतांना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर मुख्य मार्गावर अचानक मोठमोठयाने वाहनातुन धुर निघण्यास सुरूवात झाली व त्यामुळे एसटी बस पेट घेते का? असा समज झाल्याने एकच खळबळ उडाली व प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाल्याने प्रवाशांनी तात्काळ बसमधुन खाली उतरून पळ काढला.

सदरची घटना ईतर ठीकाणी घडली असती तर मोठी जिवीत हानी झाली असती.प्रस्तुत प्रतिनिधीने यावल आगारप्रमुख दिलीप महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहीती देतांना सांगीतले की,वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा असे प्राथमिक माहितीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगीतले.दरम्यान समय सुचकता बाळगुण परिसरातील नागरीकांनी व नगरपरिषदच्या अग्नीशामन बंबच्या मदतीने गाडीला वाचविण्यात यश आले.यावल आगारातील अनेक एसटी बसेस या पुर्णपणे नादुरुस्त व जिर्ण झालेल्या असुन एसटीचे ब्रेक निकामी होणे,वाहन बिघाड होवुन कुठही बंद पडणे या घटना वारंवार होत आहे यामुळे प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ चालला असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.