विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार
उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील डुंबा अनुसूचित जाती व नवबौद्ध डुंबावाडी येथे तसेच जांभूळपाडा (नान डोंगरी )आदिवासी वाडी चिर्ले येथे अनेक वर्षांपासून हायमास्ट बसविण्यात यावे अशी ग्रामस्थांनी व नागरिकांनी मागणी केली होती.आदिवासी व नव बौद्ध बांधवांना तसेच ग्रामस्थांनी हायमास्ट मागणी लावून धरली होती.ग्रामस्थांची ही महत्वाची मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर,महिला सामाजिक कार्यकर्त्या विश्रांती घरत यांच्या लक्षात आल्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांनी शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार केला.पत्रव्यवहार करून समस्या त्वरित सोडवण्याची मागणी शासनाकडे केली.कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांनी या कामी केलेल्या पाठपुराला यश आले असून २० टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत मागास वर्गीय लोकवस्ती मध्ये ऊर्जा व पथदिवे पुरविणे या योजनेअंतर्गत सौर पथदिप मंजूर झाले असून सदर सौर पथ दिप (हायमास्ट )जासई येथील मागास वर्गीय वस्तीत डुंबा येथे तसेच चिर्ले मधील जांभूळपाडा (नान डोंगरी )आदिवासी वाडी येथे बसविण्यात आले आहेत.
कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांच्या प्रयत्नामुळे सदर सौर पथदिप (हायमास्ट )बसविण्यात आल्याने सर्व मागासवर्गीय बांधवांनी,ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर,विश्रांती घरत यांचे आभार मानले आहेत.याकामी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग व समीर वठारकर गट विकास अधिकारी पंचायत समिती उरण,संतोषसिंग डाबेराव गट विकास अधिकारी पंचायत समिती उरण,वनाधिकारी नथुराम केकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत त्याबद्दल कुंदा वैजनाथ ठाकूर व विश्रांती घरत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.सदर हायमास्टचे उदघाटन वनाधिकारी नथुराम कोकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.यावेळी कुंदा ठाकूर,विश्रांती रमाकांत घरत, दिपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,विश्रांती घरत यांनी अनेक विकास कामाचा धडाका सुरू ठेवला असून आजपर्यंत अनेक विकास कामे कुंदा ठाकूर व महिला सामाजिक कार्यकर्त्या विश्रांती घरत यांच्या माध्यमातून झालेले आहेत.कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांनी केलेल्या विविध लोकोपयोगी विकास कामांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.