राज्यातील होमगार्ड्ससाठी खूशखबर !! मानधनात दुप्पट वाढ !! आता मिळणार देशातील सर्वाधिक मानधन !! देवेंद्र फडणवीसांची घोषणा
दि.१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३८ महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते.या बैठकीत राज्यातील होमगार्ड यांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.होमगार्ड यांच्याबरोबरच कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ तसेच अनुकंपा धोरणाही लागू करण्यात येणार,ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले गेले.९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाची प्रत देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर शेअर केली आहे.शासन निर्णयात होमगार्डची स्थापना आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.होमगार्ड संघटनेची स्थापना दि.६ डिसेंबर १९४६ रोजी झाली.सदर संघटनेत स्वतःचा व्यवसाय व नोकरी सांभाळून स्वयंस्फुर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरिकांची मानसेवी स्वरुपात होमगार्ड स्वयंसेवक म्हणून भरती करुन घेण्यात येते.कायदा व सुव्यवस्था राखणे,नैसर्गिक,मानवनिर्मित आपत्तींमध्ये पोलिसांना सहाय्य करणे तसेच संप काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास सहाय्य करणे ही होमगार्ड स्वयंसवेकांची प्रमुख कर्तव्य आहेत.