Just another WordPress site

बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी !! तर दुसऱ्याची चाचणी होणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी हत्या केली.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी फरार आहे.त्या आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.या प्रकरणाने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे.पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.हे दोघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांना उत्तरही दिले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग,धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली.त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे.आरोपी धर्मराज कश्यपने त्याचे वय कोर्टात १७ वर्षे असे सांगितले त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.

बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत.हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र आणि वाहन कुणी पुरवले ? याचा तपास करावा लागेल असे सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले.बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमके काय कारण आहे? आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही असेही गायकवाड यांनी सांगितले.त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता याचाही तपास करावा लागेल असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आणि असा दावा केला की अटक केलेल्या दोघांनी गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत.मृत व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यांचे अनेक शत्रू असू शकतात त्यामुळे पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद सिद्धार्थ अग्रवाल यांनी केला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी घेतली होती? पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती!

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हत्या झाली.तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.दरम्यान वाय दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांची हत्या कशी झाली ? हे आरोपी प्रशिक्षित होते का ? हत्येची सुपारी कोणी आणि का दिली ? असे अनेकविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींची काल सुटीकालीन न्यायालयात सुनावणी झाली त्यापैकी एकाला २१ ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे.या सुनावणीत पोलिसांनी न्यायालयात अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही आरोपी विविध गुन्ह्यांसाठी हरियाणा तुरुंगात शिक्षा भोगत होते यावेळी त्यांची भेट लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांशी झाली होती तेव्हाच या तिघांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालायत दिली.गुन्हा करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत.हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल शस्त्र आणि वाहन कोणी पुरवले याचा तपास करावा लागेल असे सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले.या हत्येमागील कारण आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही असे गायकवाड यांनी सांगितले.त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता याचाही तपास करावा लागेल असे सरकारी वकील पुढे म्हणाले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन आरोपी कुर्ल्यात महिन्याभरापासून १४ हजार रुपये भाड्याने राहत होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की चार आरोपींना अडीच ते तीन लाखांचे कंत्राट देण्यात आले होते हे पैसे ते आपसांत वाटून घेणार होते.पोलीस म्हणाले,गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि गौतम या तीन कथित नेमबाजांची यापूर्वी तुरुंगात भेट झाली होती हे तिघेही हरियाणाच्या तुरुंगात बिश्नोई टोळीच्या सदस्याशी संपर्कात आले होते तिथेच त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते.दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पुणे,हरियाणा,दिल्ली आणि उज्जैन येथे पथके रवाना झाली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग,धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे.आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असे सांगितले त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.

बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास हत्या करण्यात आली.बाबा सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयात चालले होते त्यावेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींनी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांची प्राणज्योत मालवली.बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी फरार असून त्या आरोपीचा शोध घेणे सुरु आहे या प्रकरणाने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे.पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत हे दोघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांना उत्तरही दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग,धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली.त्यांना काल  न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे.आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितले त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे तर गुन्हे शाखेने सगळा घटनाक्रम सांगितला आहे.या प्रकरणात आरोपींनी बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांनी काल न्यायालयात दिली.पोलिसांनी सांगितले की आरोपींकडून आम्ही दोन बंदुका जप्त केल्या आहेत.आरोपींनी पेपर स्प्रेही बाळगला होता.बाबा सिद्दीकींच्या डोळ्यांमध्ये हा स्प्रे फवारुन नंतर हल्लेखोर गोळीबार करणार होते मात्र तिसरा आरोपी शिवकुमार याने थेट गोळीबार सुरु केला.यावेळी बाबा सिद्दीकींसह तीन पोलीस हवालदार होते पण घटना इतक्या वेगात घडली की त्यांना काहीही करता आले नाही.या गोळीबारात बाबा सिद्दीकींना गोळ्या लागल्या आणि ते खाली पडले तसेच एका पोलिसाच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही माहिती दिली आहे.

२०२२ आणि त्यानंतर २०२३ साली अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना संधी दिसू लागली त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमध्ये त्यांना ४८ वर्ष पूर्ण झाली होती.अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाशी आघाडी केल्याचे माहीत असूनही बाबा सिद्दीकी यांनी राजकीय सोयीची भूमिका घेऊन पक्षप्रवेश केल्याचे बोलले गेले.२०१७ मध्ये एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका मनी लाँडरिंग प्रकरणात वांद्रे येथील त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते.राजकारणा व्यतिरिक्त सिद्दीकी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जात होते.त्यांच्या पार्ट्यांत अनेक सेलिब्रिटींची रेलचेल असायची.२०१३ साली त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र आणून दोघांमध्ये अनेक काळांपासून सुरू असलेले वितुष्ट संपुष्टात आणल्याचे बोलले जात होते.दोन्ही अभिनेत्यांचा गळाभेट घेतानाचा फोटो तेव्हा बराच गाजला होता.या भेटीच्या मध्यस्थानी होते बाबा सिद्दीकी त्यांच्यामुळे या दोघांचे वैर मिटले होते.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट.. चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश !!

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे त्या आरोपीचा शोध घेणे सुरु असतानाच आता चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे हे चौघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे. एनएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद जीशान अख्तर असे आहे.तो ७ जून रोजी पटियाला तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे.पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांच्या संपर्कात आला होता.मोहम्मद जीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.दरम्यान याप्रकरणी गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप अशा दोघांना अटक करण्यात आली त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे.आरोपी धर्मराज कश्यपने त्याचे वय कोर्टात १७ वर्षे असे सांगितले आहे त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत.हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि वाहन कुणी पुरवले ? याचा तपास करावा लागेल असे सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले.बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमके काय कारण आहे ? आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का,याबाबत माहिती मिळू शकलेली नाही असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता याचाही तपास करावा लागेल असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली मात्र बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचे कारण काय होते ?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.