‘अश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम…’ !! आजीला हॉस्पिटलमध्ये पाहून आजोबांना अश्रू अनावर !! VIRAL VIDEO पाहून पाणवतील डोळे
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार
कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिची तब्येत ठीक होईपर्यंत घरातील प्रत्येक सदस्याला तिची चिंता करत असतो.कुटुंबातील सदस्यांना स्वतःसह रुग्णालाही धीर द्यावा लागतो.रुग्णांबरोबरच कुटुंबातील सदस्यांना हॉस्पिटलमधील महागडी बिले भरताना आर्थिक संकटाला आणि रुग्णांना होणारा त्रास पाहून भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच यादरम्यान रुग्णांना घरातील सदस्यांपासून ते नातेवाईक,मित्र-मैत्रिणी भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.आपल्या बायकोला बघायला आलेल्या आजोबांना अश्रू अनावर झाले आहेत.व्हायरल व्हिडीओ हॉस्पिटलचा आहे.व्हिडीओच्या सुरुवातीला आजी-आजोबा दिसत आहेत.आजी आजारी असते त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले असते.हॉस्पिटलमध्ये आजी बेडवर झोपलेली असते तर आजोबा बेडपाशी टेबलावर बसलेले असतात.आपल्या आजारी बायकोला बेडवर गुपचूप झोपलेले पाहून आजोबा भावूक होतात.दोघेही संवाद साधत असतात तितक्यात आजोबांना अश्रू अनावर होतात आणि ते रडण्यास सुरुवात करतात.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की,आजीला बेडवर गपचूप पडलेले पाहून आजोबा रडण्यास सुरुवात करतात.आजोबांना रडताना पाहू आजी त्यांना सावरण्यासाठी मायेने हात फिरवते पण आजीला बरे नाही आहे हे लक्षात ठेवून आजोबा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आजोबांना रडताना पाहून बेडवर झोपलेल्या आजी देखील रडू लागतात.आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच पण आपल्या आवडत्या व्यक्तीला दुःखात पाहून आपल्यालाही रडू कोसळते याचे उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळाले.सोशल मीडियावर @uturaj_edits_0729 हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.तसेच व्हिडीओला ‘उगाच कोण कोणासाठी रडत नसते,अश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम खरे असते’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहे आणि डोळ्यात पाणी येणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत एकूणच या प्रेमळ व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.