Just another WordPress site

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे.उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता.अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे.राज्य सरकारकडून अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अग्रीम रकमेचा वापर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो.परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्याकरिता मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे,सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत,कृषी मंत्री अब्दुल सत्तार,सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे असतील.औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील.सदरील समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करतील तसेच यासाठी लागणाऱ्या सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.