जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचा मेळावा पार पडला.या निवडणुकीला अवघे २९ दिवस उरले आहेत.या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारावर जास्तीत जास्त भर दिल्याचं दिसून येत आहे.मुक्ताईनगर येथील प्रचारात त्यांनी लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एक भाष्य केले आहे.मी आज तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो.हेलिकॉप्टरमधून उतरल्यापासून मला जनतेचा महासागर पाहण्यास मिळाला.मी विचारले सभेला माणसे आहेत का ? इथे आल्यावर पाहिले तर प्रचंड मोठी सभा आहे.गुलाबराव म्हणाले लाडक्या बहिणींनी मनावर घेतले की त्या कुणाचेच ऐकत नाहीत. आता लाडक्या बहिणीही माझ्या लाडक्या भावांना काय करायचे ते सांगणार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.निकालाच्या दिवशी महायुतीच्या विजयाचा धमका होईल तो आयटम बॉम्बसारखा असेल.२३ नोव्हेंबरला चंदू भय्यांच्या विजयाचे फटाके फुटल्याशिवाय राहणार नाहीत.चंद्रकांत पाटील बाळासाहेब ठाकरेंचा कडवट आणि सच्चा शिवसैनिक आहे.मागच्या दोन ते अडीच वर्षांत मुक्ताई नगर मतदारसंघात पाच हजार कोटींचा निधी आपण दिला आहे.आपल्या महायुतीच्या आमदारांच्या मतदारांच्या मतदारसंघात निधी दिला आहे.मी दोन्ही हाताने देण्याचं काम करणारा मुख्यमंत्री आहे हे विसरु नका. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही मुख्यमंत्री तसेच मंत्री गुलाबराव बसले आहेत.मी जेव्हा सांगितले की लाडकी बहीण योजना करायची आहे तेव्हा विरोधकांना ही निवडणुकीपुरती घोषणा वाटली.पैसे येणार नाहीत,योजना कागदावर राहिल पण तसे घडले नाही.मी आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै खुदकी भी नहीं सुनता असा डायलॉगही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
लाडकी बहीण योजना आणली तेव्हा एका महिन्याच्या आत अंमलबजावणी केली.विरोधक चक्रावले त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तोंड काळे झाले.मग विरोधक म्हणू लागले की पैसे आलेत तर काढून घ्या.आमचे सरकार देणार सरकार आहे.देना बँक आहे,लेना बँक नाही.आपण पाच हप्ते दिले आहेत.आचारसंहिता लागल्यावर पैसे दिले जाणार नाहीत असे सांगत होते त्यामुळे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.निवडणूक आयोगाने योजना स्थगित केली अशी अफवा पसरवली.आता आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हप्ताही तुमच्या खात्यात येणार आहे.मी गरिबी पहिली आहे म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचे.कोणी माईका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,तुम्ही ताकद दिली तर दोन हजार,तीन हजार रुपये देण्यात येतील.देण्याची दानत महायुती सरकारमध्ये आहे,मला बहिणी लखपती झालेल्या पहायचे आहे असेही एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटले आहे. आम्ही कुणालाही फसवणारे नाही.माझी आई कशी काटकसर करायची मला माहीत आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.