उद्धव ठाकरेंनीच भाजपसोबत गद्दारी केली,अमित शहा गद्दारी करणारे नव्हे गद्दारांना संपवणारे- नवनीत राणांची टीका
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली.अमित शहा गद्दारी करणारे नसून ते गद्दारांना संपवणारे आहेत अशी जहाल टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज केली.हनुमान चालिसा प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंविरोधात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोर्चाच उघडला असून त्यांच्याविरोधात टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाही.आजही अमरावतीत एका खासगी कार्यक्रमावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.नवनीत राणा म्हणाल्या की राज्यात आणि केंद्रातील सरकारच्या सोबत उभे राहून आपण आपल्या राज्याचा आणि परिसराचा विकास करू शकतो.जर दम पाहायचा आहे तर ठाकरेंनी लक्षात घ्यावे.जे गद्दारीवर बोलत आहेत त्यावर मी म्हणेल की गद्दारी उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत केली तसेच फडणवीस यांच्यासोबतही त्यांनी गद्दारी केली आहे तर इतकेच नव्हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आहे.अमित शहा यांनी गद्दारी केली असे ते जे म्हणत आहेत तर अमित शहा गद्दारी करणारे नव्हे तर गद्दारांना संपवणारे आहेत.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचे अमरावतीतील स्थानिक शिवसेनेत आधीच बिनसलेले होते त्यातूनच संघर्ष वाढत गेला आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या सुचना केल्या यावरुन मविआ आणि भाजपमध्ये ठिणग्या पडल्या.त्यात तत्कालिन उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणू असे त्यांनी आव्हान दिले होते त्यानंतर मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा पठण करण्यापुर्वीच अटक करण्यात आली होती त्यानंतर शिवसेना आणि राणा दाम्पत्यांच्या संघर्षात भर पडली आहे.