काँग्रेस पक्षाने याआधी पंढरपूरमधून भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे व यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून पंढरपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार देण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली ? 

मतदारसंघाचे नाव उमेदवारांचे नाव
माढा अभिजीत पाटील
मुलुंड संगीता वाजे
मोर्शी गिरीश कराळे
पंढरपूर अनिल सावंत
मोहोळ राजू खरे

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत एकूण पाच याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी तर २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली यानंतर आज २९ ऑक्टोबर रोजी ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.