“६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी,मी आणि उद्धव ठाकरे व इतर सगळेच प्रचार सुरु करत असून महाराष्ट्रातली जनता आम्हाला उत्तम साथ देईल” शरद पवारांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली.२० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल.दरम्यान जागा वाटप होत असताना अनेक ठिकाणी एकाच पक्षातल्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंमधले नेते हे बंडखोरी करत आहेत किंवा जो तिकिट देईल त्या पक्षाची वाट धरत आहेत.महाविकास आघाडीत हे प्रमाण अधिक दिसून येत आहे.आता या सगळ्या बाबत शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे तसेच त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या आहेत.दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.एकमेकांची सुख,दुःख सांगतात.मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता दीपावलीच्या प्रसंगी समाधान आणि आनंदाने एकत्र येतील.मी सर्वांना दीपावली च्या शुभेच्छा देतो.जनतेचा आत्मविश्वास वाढो अशा सदिच्छा व्यक्त करतो असे शरद पवार म्हणाले.
१०-१२ ठिकाणी जे काही थोडेफार मतभेद आहेत ते दूर होतील.जिथे दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तिथे मार्ग काढला जाईल.६ नोव्हेंबरपासून मी,राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर सगळेच प्रचार सुरु करतो आहोत.महाराष्ट्रातली जनता आम्हाला उत्तम साथ देईल.यानंतर सिंचन घोटाळ्याबाबत शरद पवारांनाप्रश्न विचारला असता कशाला आज विचारता ? चांगला दिवस आहे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती २०१९ पेक्षा या निवडणुकीत पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रात २०२४ ला युती विरुद्ध आघाडी अशी लढत होती.आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आहेत त्यांचे चार पक्ष तयार झाले आहेत.सध्याची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे.या लढतीत सत्तेतले तीन पक्ष आणि विरोधातले तीन पक्ष असे सहा पक्ष समोरासमोर आहेत.राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष काय कामगिरी करतो ? वंचित बहुजन आघाडी आणि तिसऱ्या आघाडीची कामगिरी कशी असेल ? जरांगे फॅक्टरचा परिणाम कसा होईल ? हे सगळे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.सगळ्या पक्षांचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे मात्र अनेक ठिकाणी समोरासमोर उमेदवार देण्यात आले आहेत मात्र हा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.