Just another WordPress site

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ ग्रामीण क्षेत्राच्या जिल्हा सचिवपदी गोकुळ तायडे यांची निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील मनवेल येथील पत्रकार गोकुळ तायडे यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली आहे.हिंगोणा तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात भारतीय बद्दुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होवुन या बैठकीत संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण सचिव पदावर मनवेल येथील पत्रकार गोकुळ नामदेव तायडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.मागील काही दिवसापासुन संघटनेत राहुन काही सदस्य हे संघटनेशी एकनिष्ठ न राहता तसेच शिस्त आणी नियम पाळत नसल्याचे निर्दशनात आल्याने संघटनेचे राज्य प्रभारी अय्युब पटेल यांनी काही सदस्यांना संघटनेतुन कायमचे काढण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच याच अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीत गोकुळ तायडे यांची निवड केली आहे.

या बैठकीला संघटनेचे विभागीय समन्यवयक रणजीत भालेराव,यावल तालुका अध्पक्ष ए.टी.चौधरी,गोकुळ तायडे,राजेन्द्र आढाळे,हर्षल आंबेकर,फिरोज तडवी,सुनिल पिंजारी,सैय्यद चाँदबादशा,ईमरान पिंजारी यांच्यासह अन्य पत्रकार बैठकीस उपस्थित होते.बैठकीत सावदा येथील जेष्ठ पत्रकार जितेन्द्र कुलकर्णी यांच्यावर श्रीदुर्गादेवी विर्सजनाच्या मिरवणुकी काही जणांकडून झालेल्या असभ्यवर्तनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.