“लाडकी बहीणमुळे सरकारची तिजोरी रिकामी झाल्याने राज्यातील प्रत्येक माणसावर ६५-७० हजार रुपयांचे कर्ज होणार” !! आमदार जयंत पाटील यांचे टीकास्त्र
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार
‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली असून रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींच्या कर्जाची मागणी करावी लागली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.रेठरेहरणाक्ष (ता.वाळवा) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ नेते बी.डी.पवार, दिलीपराव मोरे,‘राजारामबापू’चे संचालक दादासाहेब मोरे,कृष्णेचे संचालक जे.डी.मोरे,माजी संचालक सुजित मोरे,अविनाश मोरे,माजी जि.प.सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच शुभांगी बिरमुळे,सुहास पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आ.जयंत पाटील म्हणाले की सरकारने लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा केल्याने सध्या तिजोरीवर ताण पडत आहे.
अगोदरच राज्यावर पावणे आठ लाख कोटींचे कर्ज आहे व पुन्हा सव्वा लाख कोटींचे कर्ज मागणी केली आहे यामुळे राज्यातील प्रत्येक माणसावर ६५-७० हजार रुपयांचे कर्ज होणार आहे.मतदारसंघातील विरोधक माझ्या विरुध्द बोलण्यास काहीच नसल्याने ऊसदराचा प्रश्न काढत आहेत मात्र आपला कारखाना राज्यात चांगला चालू असलेला कारखाना आहे यामुळे या विरोधकांच्या टीकेवर मतदार विश्वास ठेवणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.