मोर्शीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) देवेंद्र भुयार,भाजपचे उमेश यावलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गिरीश कराळे आणि अपक्ष विक्रम ठाकरे यांच्यात लढतीचे चित्र आहे.कुणबी,माळी आणि मुस्लीम मतांच्या विभागणीवर विजयाचे गणित ठरणार आहे.धामणगाव रेल्वेत भाजपचे प्रताप अडसड,काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्यात पुन्हा एकदा तिहेरी लढतीचे चित्र आहे.तिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि भाजपचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत आहे.राजेश वानखडे हे गेल्यावेळी शिवसेनेकडून रिंगणात होते.काँग्रेसचा हा पारंपरिक गढ टिकवून ठेवण्याचे कौशल्य यशोमती ठाकूर यांना दाखवावे लागणार आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दर्यापुरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गजानन लवटे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्यात सामना आहे.युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्या उमेदवारीने निवडणुकीतील रंगत वाढवली आहे.बौद्ध समाजाची मते या ठिकाणी निर्णायक ठरू शकतील.अचलपूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजपने आव्हान उभे केले असतांना आपली नौका पैलतिरी नेण्याची कडू यांची धडपड आहे.भाजपचे बंडखोर प्रमोदसिंह गड्रेल यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.जातीय संवेदनशील मानल्या गेलेल्या या मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण महत्वाचे ठरणार आहे.मेळघाटमध्ये प्रहारचे राजकुमार पटेल,भाजपचे केवलराम काळे आणि काँग्रेसचे डॉ.हेमंत चिमोटे यांच्यात तिरंगी मुकाबला असून ही लढत तूल्यबळ मानली जात आहे.राजकुमार पटेल यांनी महायुतीला साथ दिली आणि नंतर नाईलाजाने प्रहारचा झेंडा हाती घ्यावा लागला.केवलराम काळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपची उमेदवारी मिळवली.या दोघांसमोर जुन्या लोकांना एकत्रित करण्याचे आव्हान आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.