पश्चिम बंगाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह कार्यालयाच्या आत आढळल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे.सदरहू सदर महिलेने हे मान्य केले आहे की धारदार शस्त्रांनी तिने या कार्यकर्त्यावर वार केले.या प्रकरणात या महिलेने ही कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह भाजपा कार्यालयाच्या आत सापडल्याची ही घटना पश्चिम बंगाल येथील २४ परगणा जिल्ह्यातील उस्थी या ठिकाणी घडली आहे.पृथ्वीराज नासक असे या हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.जिल्ह्यातील भाजपाची सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्याचे काम पृथ्वीराजकडे होते व या प्रकरणात महिलेला अटक झाल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर पु्न्हा एकदा आरोप केला आहे.पृथ्वीराज नासकर या भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह भाजपाच्या कार्यालयाच्या आतल्या बाजूला शुक्रवारी रात्री आढळून आला.पृथ्वीराज हे त्यांच्या घरातून ५ नोव्हेंबर पासून बेपत्ता होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.यानंतर या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे.या महिलेने धारदार शस्त्रांनी पृथ्वीराज नासकर यांची हत्या केल्याचे मान्य केले आहे.आम्ही सदर महिलेची चौकशी करतो आहोत.पृथ्वीराज नासकर आणि या महिलेचे काही प्रेमसंबंध होते का ? किंवा त्यांच्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला जाऊन ही घटना घडली का ? या पैलूंचा आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.
आम्ही मोबाइल फोन,त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज या अनुषंगानेही तपास करत आहोत तसेच महिलेला या पृथ्वीराज नासकरची हत्या करण्यासाठी कुणी चिथावले होते का ? हा पैलूही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.त्या अनुषंगानेही आमचा तपास सुरु आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले.आम्ही जेव्हा घटनास्थळी गेलो तेव्हा आमच्या पथकाने कार्यालयाचे समोरचे गेट तोडले कारण ते आतल्या बाजूने बंद होते.महिलेने हत्या केली आणि ती मागच्या दरवाजाने पळून गेली असे घडलेले असू शकते असेही पोलीस म्हणाले मात्र या महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे.या प्रकरणात ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे तिने पृथ्वीराज नासकर यांची हत्या केल्याचे मान्य केले आहे.पोलीस या महिलेची चौकशी करत आहेत.दुसरीकडे भाजपाने या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आऱोप केला आहे.भाजपाच्या पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्ष सुखंता मजुमदार यांनी या पृथ्वीराज नासकर हत्या प्रकरणामागे तृणमूलचा हात आहे हा आरोप केला आहे.