दरम्यान नांदेडमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी दाखवत असलेल्या लाल संविधानावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते.“काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत त्यावर भारताचे संविधान असे लिहिले आहे मात्र त्या पुस्तकाची पान कोरी आहेत.निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष करतो आहे.संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणे आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणे हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती.