१०० दिवसांत काय करणार ?

– महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहा ३ हजार,मोफत बस प्रवास

– स्वयंपाकाचे ५०० रुपयांमध्ये सहा गॅस सिलिंडर

– निर्भय महाराष्ट्र धोरण आखून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे,शक्ती कायद्याची अंमलबजावणी

– महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीसाठी दोन दिवस ऐच्छिक रजा

– जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे बँकेत ठरावीक रक्कम,१८ वर्षांनंतर एक लाख रुपये

– शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी,कर्जफेडीस ५० हजार सूट

– शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

– तरुण पदवी-पदविकाधारक बेरोजगारांना दरमहा ४००० रुपये भत्ता

– युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोग’

– सरकारी रुग्णालयांत मोफत औषधे

– नवे औद्योगिक धोरण आखणार,महिला उद्याोजकतेला प्रोत्साहन देणार

– सूक्ष्म व लघु उद्याोगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

– महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार

– संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची रक्कम दीडवरून दोन हजार रु.

– दरमहा तीनशे युनिटपर्यंत वापर असणाऱ्या ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ

– सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

– वृद्ध कलावंताच्या मानधन वाढ

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार,

– निवडणुका एकदस्यीय प्रभाग पद्धतीने

– शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘राज्य नागरी आयोग’

– इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वेळेत करण्यासाठी आराखडा

– महायुतीने काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार

– खासगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याबाबत काढलेल्या आदेशांचा फेरविचार करणार

– जगभरातील मराठी आणि महाराष्ट्रातील परभाषिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम

मिशन २०३०

– महिलांना स्वयंरोजगारासाठी ५ लाखांपर्यंत अत्यल्प व्याजदराने कर्ज

– शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी

– आरोग्य,शेतकऱ्यांचे संरक्षण आणि हवामान बदलाचे संकट पेलण्यासाठी ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’

– कांदा आणि टोमॅटोला संरक्षण देत राज्यात गुलाबी आणि शेंदरी क्रांती

– पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार

– अभिनव स्टार्टअप्ससाठी १ कोटीचा निधी

– इतर मागासवर्ग,अनुसूचित जातीजमातींतील उद्याोजकांना १ कोटी रुपयांचे अनुदान

– ‘गिग’ कामगारांना कायद्याचे संरक्षण

– महाराष्ट्रासाठी नवे शैक्षणिक धोरण

– मोदी सरकारच्या श्रम संहिता नाकारणार

– आनंदी शहरे विकसित करणार,मैदाने,उद्याने,मोकळ्या जागांचा विकास

– ‘नेट झीरो’ धोरण साकारण्याच्या दृष्टीने सस्टेनेबिलिटी सेलची स्थापना

– शहरांनजीक मोठ्या गावांत झोपडपट्टी पुनर्विकास योजना

– खाद्यातेल,तूर डाळ केशरी कार्डधारकांना रेशनवर

– सीमाप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर विकसित करणार

– खासगी कंपन्यांच्या वीजदरांवर अंकुश ठेवण्यासाठी मीटरचे लेखापरीक्षण

– कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण

अशी विविध आश्वासने महाविकास आघाडीच्या वतीने ‘महाराष्ट्रनामा’ जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत.