बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांनाच धोका द्यायचा?काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांची शिंदे गटावर टीका
अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या निवडणुकीत भाजपाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे मात्र आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील उमेदवारीबाबत काही प्रश्न उपस्थित करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.बाळासाहेब यांचे नाव घ्यायचे आणि बाळासाहेब यांनाच धोका द्यायचा असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली.तुम्ही जर स्वत:ला शिवसेना मानता भाजप देखील म्हणते की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.तर मग अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची असताना तुम्ही तुमचा उमेदवार का उभा केला नाही?भाजपच्या उमेदवाराला का पाठिंबा दिला?असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.