यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
येथे १९८८-८९ यावर्षी शिकत असलेल्या सर्व मित्रांनी एकत्र येत महर्षी व्यासांच्या मंदिराजवळील कार्यालयात नुकतेच गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान मोबाईलवर ग्रुप तयार करून त्या ग्रुपचे हॅप्पी फ्रेंड्स ग्रुप नाव ठेवून त्या माध्यमातून सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत गेट-टुगेदर चा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रसंगी त्यावेळेस शिकवणारे शिक्षक प्रा.आर.जी.बीरपणकर (बिरपणकर सर) यांच्या हस्ते महर्षी वेद व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण करण्यात आले नंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दरम्यान कार्यक्रमात दिवंगत मित्रांना दोन मिनिट मौन पाळुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात दीपक पाटील यांनी मित्रांच्या हृदयस्पर्शी अशा कवितेने केली.प्रसंगी सर्वच मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.व्यासपीठावर ग्रुपचे सदस्य प्रा.मुकेश येवले, वासुदेव चौधरी,सुनील वाणी,धनराज कासार,दीपक पाटील होते.प्रसंगी ३५ वर्षानंतर एकत्र आलेल्या साऱ्या मित्रांना खूपच गहिवरून आले होते.यावेळी प्रा.आर.जी. बिरपनकर,प्रा.मुकेश येवले,सुनील वाणी,दीपक पाटील,संजय करांडे,महेश वाणी,रवींद्र टोंगळे,पुरुषोत्तम बोबडे,मंगेश चिनावलकर,गजानन कासार,जगदीश आवळकर,महेश सराफ,राजेंद्र चौधरी,मनीषा श्रावगी,मीनाक्षी धवसे,संजीवनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील तर आभार सुनील वाणी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय करांडे,सुनील महाजन व सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.