डॉ.डिगंबर तायडे आणि शकुंतला तायडे हे तायडे दाम्पत्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “समाज भूषण” व “कला भूषण” पुरस्काराने सन्मानित !!
"डोंगर कठोरा वासियांशिवाय महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा रोवला मानाचा तुरा"
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्राची शान व आपल्या गायनाच्या माध्यमातून दिवसेंदिवस एकामागून एक किताब आपल्या शिरपेचात रोवून महाराष्ट्राचे नाव देशात नव्हे तर परदेशातही गाजविणारे आणि जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील मुळ रहिवाशी तसेच सध्या डोंबिवली येथे वास्त्यव्यास असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाचे सीव्हील इंजिनिअर डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “समाज भूषण” पुरस्काराने तसेच त्यांची पत्नी शकुंतला डिगंबर तायडे यांना “कला भूषण” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.सदरील पुरस्कारामुळे डोंगर कठोरा वाशियांशिवाय महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,सुरेश वाडकर सभाग्रह दादर येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबईचे माजी शेरीफ,डॉ.जगनाथराव हेगडे (पीएमजेएफ),जिल्हा राज्यपाल यांच्या हस्ते डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांना सन २०२३-२४ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शकुंतला तायडे यांनी देखील दैदिप्यमान कामगिरी केल्याने त्यांना देखील या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “कला भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदरील तायडे जोडगोडीच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल डॉ.डिगंबर सीताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांचे देशभरातून व विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.