मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी रात्री मुंबईतल्या मालाड व जोगेश्वरीमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या व या प्रचारसभांमधून त्यांनी महाविकास आघाडीसह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली.मालाडमध्ये फडणवीसांनी भाजपा उमेदवार विनोद शेलार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ओवैसी यांना त्यांच्याच हैदराबादी भाषेत महाराष्ट्रात येऊ नका असे सांगितले तर गोरेगावचे भाजपा उमेदवार विद्याताई ठाकुर व वर्सोवाच्या भाजपा उमेदवार डॉ.भारतीताई लव्हेकर यांच्या प्रचारार्थ जोगेश्वरी पश्चिम मुंबई येथे देखील जाहीर सभा घेऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,“हल्ली ते ओवैसी देखील (हैदराबादचे खासदार व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी) आपल्या राज्यात,इथल्या मतदार संघांमध्ये येऊ लागले आहेत,फिरू लागले आहेत.मला त्यांना सांगायचे आहे,मेरे हैदराबादी भाई,उधरी रहना,इधरकू मत आना,इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं (माझ्या हैदराबादी भावा,तू तिकडेच थांब,इथे येऊ नको,इथे तुझे काही काम नाही.) मला एक गोष्ट कळत नाहीये इथे नेमके काय चालले आहे? इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत.औरंगजेबाचे महिमामंडन केले जात आहे.त्या लोकांना मला सांगायचे आहे की भारताचा जो सच्चा मुसलमान आहे तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही कारण औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता व त्याने आमच्यावर अनेक आक्रमणे केली आहेत.म्हणून मी म्हणतो,अरे सुन ले ओ ओवैसी,कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर !” असे देवेंद्र फडणवीस यांनी असदुद्दीन ओवैसी यांना ठणकावून सांगितले आहे.