“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का ? आता परिणाम भोगा” !! रवी राणांचे अजित पवारांना प्रत्युत्तर !!
लोकसभेला नवनीत राणा या महायुतीच्या खासदारकीच्या उमेदवार होत्या त्यावेळी सुलभा खोडके यांची विनाशकाले विपरीत बुद्धी कुठे गेली होती त्यावेळी खोडके यांनी नवनीत राणांच्या विरोधात प्रचार केला.ज्यावेळी अजित पवार अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचाराला आले तेव्हा सभेलाही त्या आल्या नाहीत.त्याठिकाणी त्यांच्या फोटो वापरण्यासही त्यांनी नकार दिला.एकंदरिकतच ज्यावेळी सुलभा खोडके यांनी नवनीत राणांच्या पराभवासाठी युद्ध पातळीवर काम केले तेव्हा अजित पवार यांनी त्यांची कानउघडणी का केली नाही ? ते त्यांना हा श्लोक का आठवला नाही ? असे रवी राणा म्हणाले.खरेतर जसे कर्म कराल तसे फळ आपल्याला मिळत असते.आज अमरावती शहरात सुलभा खोडके तिसऱ्या क्रमांकवर आहे.तिथे काँग्रेस आणि जगदीश गुप्ता यांच्यात मुख्य लढत आहे.आज अजित पवार काहीही बोलले तरी लोकसभेला ते का शांत राहिले ? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.लोकसभेला सुलभा खोडके यांनी नवनीत राणा यांचे काम केले नाही म्हणून त्यांच्या विरोधात जनतेचा रोष आहे व त्यांचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रियाही रवी राणा यांनी दिली.दरम्यान रवी राणांच्या बोलण्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला अशी टीकाही अजित पवार यांनी केली होती.यासंदर्भात विचारले असता,अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत आणि महायुतीत आम्ही सगळे एकत्र आहे.एकत्र असतांना त्यांनी असे बोलणे हे त्यांना शोभत नाही.ते जर अशाप्रकारे विधाने करत असतील तर जशास तसे उत्तर देण्यास रवी राणा सक्षम आहे असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.