गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ३० जागा जिंकल्या होत्या.भाजपाला २५ आणि काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या.पहिल्या टप्प्यातील जागांसाठी ७३ महिलांसह एकूण ६८३ उमेदवार रिंगणात आहेत.४३ मतदारसंघांपैकी १७ सर्वसाधारण जागांसाठी २० अनुसूचित जमातीसाठी आणि सहा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.झारखंडमध्ये भाजपाचा प्रचार केवळ सांप्रदायिक ध्रुवीकरणावर केंद्रित आहे.१० वर्षांच्या सत्तेनंतरही भाजपा केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला.येत्या १३ आणि २० नोव्हेंबर रोजी झारखंडमधील जनता सातत्य,जातीय सलोखा आणि आत्मसन्मानासाठी निर्णायकपणे मतदान करतील असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला.झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचा प्रचार गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामगिरीवर आहे,आम्ही सर्वसमावेशक आणि समृद्ध झारखंडसाठी आमची दृष्टी आदींवर लक्ष केंद्रित करत आहोत असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.