मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व भारतीय जनता पक्षाप्रमाणचे राज्यातील इतर सर्वच पक्षांकडून आक्रमक प्रचार केला जात आहे.प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे दिसून येत आहे त्यातच काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कटेंगे तो बटेंगे व एक है तो सेफ है या सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवरून टीका केली यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत चक्क तिजोरी आणल्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.“महाराष्ट्राची निवडणूक विचारसरणीची निवडणूक असून एकदोन अतीश्रीमंत आणि गरीबांमध्ये ही निवडणूक आहे. अरबपतींना वाटते की मुंबईची जमीन त्यांच्या ताब्यात जावी.१ लाख कोटींचा अंदाज आहे.एका अती श्रीमंताला १ लाख कोटी देण्याचा हा प्रकार आहे.आम्हाला वाटते की महाराष्ट्रातील शेतकरी,गरीब,बेरोजगारांना मदतीची गरज आहे.रोजगार,महागाई या इथल्या प्रमुख समस्या आहेत” असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेवरून खोचक टीका करतानाच राहुल गांधींनी चक्क पत्रकार परिषदेत एक तिजोरीच आणली व या तिजोरीवर ‘एक है तो सेफ है’ हे वाक्य लिहिले होते.या तिजोरीतून राहुल गांधींनी दोन बॅनर काढले त्यातल्या एका बॅनरवर पंतप्रदान नरेंद्र मोदी व गौतम अदाणी यांचे एकमेकांना नमस्कार करतानाचे फोटो होते तर दुसऱ्या बॅनरवर धारावीचा नकाशा होता.यावेळी त्यांनी धारावी अदाणींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला.मोदी व अदाणींचे लक्ष धारावीवर आहे.एकीकडे अदाणी आहेत तर दुसरीकडे शेतकरी,शेतमजूर,तरुणांची स्वप्न दररोज तोडली जात आहेत.तिजोरीवर लिहिलेले हे एक है तो सेफ है हे मराराष्ट्राचे धोरण आहे.त्यांच्या घोषणेतले एक नरेंद्र मोदी,अदाणी,अमित शाह आहेत.सेफ कोण आहेत ? अदाणी सेफ आहेत.कष्ट धारावीच्या जनतेला होतील.नुकसान धारावीच्या जनतेचे होईल.एका व्यक्तीसाठी धारावी संपवली जात आहे.या निवडणुकीची घोषणा मोदींनी एकदम बरोबर दिली आहे.एक है तो सेफ है.प्रश्न हा आहे की एक कोण आहे आणि सेफ कोण आहे असे राहुल गांधी म्हणाले.संपूर्ण राजकीय व्यवस्थाच एका व्यक्तीला मदत करण्यासाठी फिरवण्यात आली. आमची खात्री आहे की ही धारावीची लूट असून ती एका व्यक्तीला दिली जात आहे व याच व्यक्तीला देशाची विमानतळ,बंदरे,संरक्षण खात्याच्या उत्पादन क्षेत्राची सर्व व्यवस्था दिली जात आहे.अदाणी हे सगळे एकट्याने करू शकत नाहीत.पंतप्रधानांच्या मदतीशिवाय धारावी भारताच्या नागरिकांकडून अशी काढून घेतली जाऊ शकत नाही.महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार की एका व्यक्तीला हा मुद्दा आहे असेही राहुल गांधी म्हणाले.