इंडिया टुडेशी बोलतांना दिलीप जोशी म्हणाले,“मला फक्त या सर्व अफवा दूर करायच्या आहेत.माझ्या आणि असित भाईबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या आहेत ज्या पूर्णपणे खोट्या आहेत अशा गोष्टी बोलल्या जातात हे पाहून मला खूप वाईट वाटते.तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो माझ्यासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.जेव्हा लोक अशा अफवा पसरवतात तेव्हा फक्त आम्हालाच नाही तर आमच्या प्रेक्षकांनाही त्रास होतो.तसेच इतक्या वर्षांपासून अनेकांना भरभरून आनंद देणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मकता पसरवली जाते हे पाहून खूप वाईट वाटते.प्रत्येक वेळी अशा अफवा येतात आणि त्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण आम्हाला द्यावे लागते हे निराशाजनक आणि वैताग आणणारे आहे कारण फक्त आम्हीच नाही तर ज्यांना हा शो आवडतो ते सर्वजण अशा बातम्या वाचून अस्वस्थ होतात. दिलीप जोशी यांनी शो सोडण्याच्या अफवाही फेटाळल्या.“याआधीही मी शो सोडल्याच्या अफवा होत्या त्या पूर्णपणे खोट्या होत्या आणि आता असे वाटते आहे की दर काही आठवड्यांनी असित भाई आणि शोला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशी कथा रचली जातेय.अशा गोष्टी पुन्हा-पुन्हा घडताना पाहून वाईट वाटते पण शोला इतके यश मिळतय त्याचा कोणाला तरी हेवा वाटतोय त्यामुळे ते या गोष्टी करत आहेत” असे दिलीप जोशी म्हणाले.या सगळ्या गोष्टी कोण पसरवतय हे मला माहीत नाही पण मी हे स्पष्ट करतोय की मी मालिकेच्या सेटवर आहे.रोज तेवढ्याच प्रेमाने मी या शोसाठी काम करतोय.मी कुठेही जाणार नाही.मी खूप वर्षांपासून या सुंदर प्रवासाचा एक भाग आहे आणि मी यापुढेही त्याचा एक भाग राहीन असे दिलीप जोशी यांनी नमूद केले आहे.