Just another WordPress site

निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ नोव्हेंबर मंगळवार

तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणाऱ्या महीलांचे वाहन अनियंणत्रीत होवुन झालेल्या अपघातात चार महिला शिक्षीका व कर्मचारी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या चारही महिलांना उपचारासाठी चोपडा येथे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार उपकार्यालयासमोर आज दि.१९ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०३ बिजे ८२५३ या गाडीने चोपडयाकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय कामाकरिता जात असतांना वाहनाचा ताबा वाहन चालकाकडून सुटल्याने अनियंणत्रीत झाल्याने वाहनाचा अपघात होवुन यातील मिनाक्षी सुलताने,शिक्षीका ज्योती भादले,शिक्षीका लतिका परवीन तडवी व ग्रामसेविका कविता बाविकर या जखमी झाल्या असुन सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.सदरहू त्यांना नागरिकांच्या मदती तात्काळ किनगाव येथील प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात येथील पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.