सुरेखा खंडाळे,मीरा हेमंत बिघे,पारु दहातोंडे,जायदा शेख या बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी पावणेएकच्या सुमारास गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्ट येथील मतदान केंद्रात मतदानाला निघाल्या होत्या त्यावेळी भाजप उमेदवार सुनील कांबळे,तुषार तानाजी पाटील,तनवीर तानजी पाटील,अरविंद जाधव,आकाश अविनाश पाटोळे,सनी अडागळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली व अश्लील वर्तन केले तसेच आमच्याविरुद्ध तक्रार केल्यास त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.मी स्थानिक आमदार आहे,राज्यात आमचाच गृहमंत्री आहे अशी धमकी सुनील कांबळे यांनी दिली असा आरोप खंडाळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.दरम्यान दयानंद अडागळे,ज्योती अडागळे,आरती रमेश अडागळे,हितेशा दत्तात्रय अडागळे या बुधवारी गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्टच्या मतदान केंद्रात थांबल्या होत्या त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते तनवीर तानाजी पाटील,तुषार पाटील हे पाच ते सहा साथीदारांसह तेथे आले व त्यांनी दयानंद अडागळे यांना धक्काबुक्की केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली तसेच भाजपला मतदान करा नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान करतांना रोखले असा तक्रार अर्ज दयानंद राजू अडागळे यांनी खडक पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दिला आहे.