दरम्यान १९ नोव्हेंबर रोजी विनोद तावडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याबाबत बविआने त्यांच्यावर पैसे वाटप केल्या आरोप केला होता. विरारमधील एका हॉटेलमध्ये चार तास हा राडा सुरु होता यामुळे मोठी खळबळ उडाली होती.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावरूनच भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.खुद्द गौतम अदाणी व त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असल्याचा हा आरोप आहे.या सगळ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार ०१९ कोटी रूपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. अदाणी व अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी हा सगळा प्रकार कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला व त्यातून ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज व रोखे गोळा केले असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत दरम्यान हे आरोप अदाणी समूहाकडून फेटाळण्यात आले आहेत.