राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महायुतीने बाजी मारत २३० जागांवर विजय मिळवला यामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर बाजी मारली.महायुतीतून सर्वात कमी जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४१ जागांवर विजय मिळवला.दुसरीकडे सर्वत्र महाविकास आघाडीची सत्ता येणार अशी चर्चा असताना त्यांचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४७ जागा आल्या यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २०,काँग्रेसने १९,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने १०,समाजवादी पक्षाने २ व शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम) ने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.