दरम्यान आपण मरेपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे आव्हाड म्हणाले.आजच्या बैठकीत सगळ्या आमदारांनी एकमताने शरद पवारांनाच सगळे निर्णय घेण्याचे अधिकार दिले.अजित पवार गटाकडून आणि स्वत: अजित पवारांचे आमच्या वेगवेगळ्या आमदारांना फोन जात आहेत.पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत की आता राहिलय काय या आमच्याकडे.आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार.आमचे कुणीही या मानसिकतेत नाही की शरद पवारांना सोडून जायचे ही अजित पवारांची जुनी सवय आहे.मी नाव घेऊनही सांगू शकतो की त्यांनी कुणाकुणाला फोन केले.मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार आहे असे ते म्हणाले.दरम्यान पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.पिपाणी चिन्हामुळे आमचे नुकसान झाले.आमच्या १० जागा पिपाणीमुळे पडल्या.दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात देवदत्त निकम यांच्याप्रमाणेच सारखेच नाव असणाऱ्या व्यक्तीला ४ हजार मते पडली.वळसे पाटील १२०० ते १५०० मतांनी निवडून आले त्यामुळे त्याचा फटका बसलाच असे ते म्हणाले.

“शेवटचे दोन दिवस अमित शाह जातात कुठे?”

दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवशी अमित शाह अचानक महाराष्ट्रातून निघून गेले आणि त्यानंतर निकाल फिरले अशा आशयाचा दावा आव्हाडांनी यावेळी केला. “मला एक प्रश्न पडलाय.हरियाणाच्या प्रचाराच्या ऐन शेवटच्या दोन दिवस शाह हरियाणातून निघून गेले.महाराष्ट्राच्या प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत अमित शाह निघून गेले.हे दोन दिवस जातात कुठे हा एक चौकशीचा मुद्दा आहे.मग निवडणुका होतात आणि फिरतात.तेव्हाही त्यांनी जम्मू-काश्मीर दिले आणि हरियाणा घेतले.इथेही झारखंड दिले आणि महाराष्ट्र घेतले हे संशयास्पद आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.