मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !! १४ वी विधानसभा विसर्जित !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार ? याची जोरदार चर्चा होत आहे.१४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपत आहे व त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याची बाब राजकीय जाणकार व्यक्त करतात.दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देण्यात यावे यासाठी दबाव टाकला जात आहे तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जावे अशी मागणी होत आहे.आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे म्हणजे…”, दीपक केसरकर यांचे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले,“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे म्हणजे ही एक केवळ औपचारिकता आहे ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील.लवकरच सरकारचा शपथविधी पार पडेल.”