Just another WordPress site

भालेवाडी येथे उज्वला‎ महिला ग्रामसंघ फलकाचे‎ उद्घाटन

मारेगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण‎ जिवोनोन्नती अभियान अंतर्गत‎ उज्वला महिला ग्रामसंघ‎ भालेवाडीच्या मध्यमातून बचत गट‎ तयार करण्यात आला असून या‎ बचत गटाच्या माध्यमातून अनेक‎ गरीब महिलांचे स्वप्न साकार होणार‎ आहे.‎तालुक्यातील भालेवाडी येथे‎ तालुका अभियान व्यवस्थापक‎ तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष‎ प. स. मारेगाव यांच्या‎ मार्गदर्शनाखाली नुकतेच उज्वला‎ महिला ग्रामसंघच्या फलकाचे‎ उद्घाटन करण्यात आले आहे.‎

बचत गटाच्या माध्यमातून महिला‎ सक्षमीकरण करून महिलांची‎ उपजीविका वाढवण्याच्या‎ दृष्टिकोनातून महिलांची आर्थिक‎ परिस्थिती सबळ होईल व छोटे छोटे‎ उपक्रम राबविला जाणार‎ असल्याची माहिती उपस्थितांनी‎ दिली.या उद्घाटन प्रसंगी सदस्य मारोती‎ गौरकार,ग्रा.पं.सदस्य अंकुश‎ माफुर,‎ग्रामसंघ अध्यक्षा मीना खडसे,‎सचिव सुनंदा टेकाम,प्रभाग‎ कृषी व्यवस्थापक महेश पाचपोहर,‎प्रभाग पशु व्यवस्थापक प्रफुल्ल‎ शंभरकर व समुदाय संसाधन सखी‎ सारिका कुमरे,यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‎

Leave A Reply

Your email address will not be published.